पोलिसांनी केलेली कारवाई पूर्वनियोजित खरातकडे २०० कोटींची संपत्ती
बातमीचे मुख्य हायलाईट्स (Highlights): एसआयटी (SIT) कडे तपास: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे; आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार चौकशीचे नेतृत्व. गुन्ह्यांची मालिका: खरातवर आतापर्यंत एकूण ३ गंभीर गुन्हे दाखल; महिलेवर अत्याचार, खंडणी आणि अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप. २०० कोटींची संपत्ती: खरातच्या ट्रस्टचे व्यवहार, मालमत्ता आणि पेनड्राइव्हमधील आक्षेपार्ह व्हिडिओंची सखोल चौकशी होणार. अश्लील व्हिडिओंची धमकी: ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल. पुराव्यांचे हस्तांतरण: केस डायरी, पेनड्राइव्ह आणि सर्व तांत्रिक पुरावे तात्काळ एसआयटीकडे सोपवण्याचे राज्य सरकारचे आदेश.
एसआयटी (SIT) कडे तपास: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे; आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार चौकशीचे नेतृत्व.
गुन्ह्यांची मालिका: खरातवर आतापर्यंत एकूण ३ गंभीर गुन्हे दाखल; महिलेवर अत्याचार, खंडणी आणि अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप.
२०० कोटींची संपत्ती: खरातच्या ट्रस्टचे व्यवहार, मालमत्ता आणि पेनड्राइव्हमधील आक्षेपार्ह व्हिडिओंची सखोल चौकशी होणार.
अश्लील व्हिडिओंची धमकी: ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल.
पुराव्यांचे हस्तांतरण: केस डायरी, पेनड्राइव्ह आणि सर्व तांत्रिक पुरावे तात्काळ एसआयटीकडे सोपवण्याचे राज्य सरकारचे आदेश.
नाशिक : प्रतिनिधी Kharat 200 Crore Assets
नाशिकचा भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतला असून खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे खरातची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. तसेच त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यासह सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खरातवर एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.२०० कोटी संपत्ती
दरम्यान, या तिन्ही गंभीर गुन्ह्यांमध्ये विविध कलमे लागू करण्यात आल्याने राज्य पोलीस मुख्यालयाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सर्व संबंधित कागदपत्रे, केस डायरी आणि उपलब्ध पुरावे तात्काळ एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एसआयटी प्रमुख सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता नाशिक गुन्हे शाखेने जप्त केलेले पेन ड्राइव्हमधील व्हिडिओ, इतर संभाव्य पीडित महिला, ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि राजकीय-धार्मिक संबंध यांची सखोल चौकशी करणार आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या घराची झडती घेतल्यानंतर मिरगाव येथील फार्म हाऊसवर बुधवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांना सापडले. त्यात अशोक खरातची मालमत्ता आणि अन्य काही कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. फार्म हाऊसमधून एक पिस्तूलदेखील पोलिसांनी जप्त केले. काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडले आहेत.
ही पूर्वनियोजित कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यानंतर थेट कृती करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अशोक खरातला पकडण्यासाठी सापळा रचला. अटकेची माहिती मिळताच तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळाच डाव आखला. परिसरात चोरी झाल्याचा बनाव करून पोलिसांनी कारवाई सुरू केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक घरात शिरले, तर दुसरे पथक बाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
भोंदू खरातकडे २०० कोटींची संपत्ती
अशोक खरातने गेल्या काही वर्षांत सुमारे २०० कोटींची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. यात नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील एक अलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर परिसरात ऑफिस, पाथर्डी परिसरात कोट्यावधींची ३० एकर जमीन आणि सिन्नर, ओझर विमानतळ परिसरासह शिर्डीतील कोट्यवधींच्या जमिनीचा समावेश आहे.
“नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला अटक; SIT कडून ५८ अश्लील व्हिडिओंचा तपास सुरू.”
दरम्यान, अशोक खरातच्या सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची नाशिक पोलिसांकडून रात्री तपासणी करण्यात आली. याशिवाय मिरगावतील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयाची देखील झाडाझडती घेण्यात आली. यावेळी तेथील स्थानिकांनी मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा राबता असायचा अशी माहिती पोलीसांना दिल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातची पाथर्डीत सर्व्हे क्रमांक ३३, ९३, ९७, १३२, १३८, २०३, २२०, मध्ये ३० एकर जमीन असून, याची किंमत अंदाजे १५० कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते. याशिवाय गौळणे शिवारात त्याने पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्तबालाच्या नावे ३० कोटींच्या जमीनीचे खरेदी खत केल्याचे समजते. तर कहांडळवाडी, मीरगाव येथे ४५ एकर जमीन असून याची किंमत साधारणता दोन कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे. तसेच मीरगाव येथील मंदिराच्या मागे असलेल्या त्याच्या भव्य फार्महाऊसची किंमत सुमारे १० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. त्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास आहे. तर ओझर विमानतळाजवळ पाच कोटींची जमीन असून, शहरातील कर्मयोगीनगरच्या आलिशान बंगल्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. तर कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसची किंमत १ कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे सर्व संपत्तीची किंमत सुमारे २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.२०० कोटी संपत्ती